Great Bhet
राणूआक्का (स्वराज्य रक्षक संभाजी)

Pune  April 22,2019

  

काल आजोबांना राणू आक्का ला भेटायचे होते, आमचे छोटे बंधू प्रज्वल उत्तमराव पाटणकर व भावी ऍक्टर शुभम ची आणि राणू आक्का ची खास ओळख. काल आक्का भेटल्यानंतर ते ही प्रकर्षाने जाणवले, अगदी घरच्यासारखं आक्काने आजोबांची, आप्पांची, आंटीची सगळ्यांची विचारपूस केली. क्रेटा या आमच्या नव्या गाडीचे विशेष कौतुक करून छान फोटो सेशन ही केले. अत्यंत मनमिळावू व मालिकेतील आक्का साहेबांसारखाच पेहराव आणि स्वभाव चटकन मनाला भावात होता. नुकतेच या मालिकेचे 500 भाग संपन्न झाले, त्यांच्या भावी वाटचालीस आमच्या पाटणकर कुटुंबियांकडून मनापासून शुभेच्छा
या वयातही 90+ आमचे आजोबा ही मालिका आवडीने पाहतात आणि त्यातीलच राणू आक्का ला भेटायला मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक विशेष आनंद बहरला होता. आक्कानेही फार मनापासून आजोबांचे कौतुक करून मनसोक्त गप्पा मारल्या